For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला सबलीकरणासाठी काँग्रेसला मत द्या

11:08 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला सबलीकरणासाठी काँग्रेसला मत द्या
Advertisement

चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचे हुक्केरीत आवाहन

Advertisement

बेळगाव : महिलांचे दु:ख जाणून राज्य सरकारकडून गॅरंटी योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिकरीत्या सबल करण्यात आले आहे. महिलांनी यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन आपणाला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कणगला, संकेश्वर, अम्मणगी आदी भागामध्ये प्रचार करून कार्यकर्त्यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची भूमिका मोठी आहे. काँग्रेस पक्षाकडून पुरुषांनाच नव्हे तर महिलांनाही उमेदवारी देऊन महिला सबलीकरणाला प्राधान्य दिले आहे. यामुळे मतदारांनी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळी परिस्थितीमध्ये गोरगरिबांना गॅरंटी योजनांमुळे अधिक दिलासा मिळाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पाच गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे, हे लक्षात घेऊन मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा. भाजपकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सतीश जारकीहोळी फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करून सामाजिक कार्य केले जात आहे. आपले वडील सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देऊन मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्याप्रमाणे आपल्या मतदारसंघाचा विकास केला असून भविष्यामध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षालाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, शशिकांत नाईक, जयप्रकाश करजगी, विनोद नाईक, दिलीप होसमनी, चिदानंद करदण्णावर, प्रवीण नेसरी, विक्रम कर्निंग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.