For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपला मतदान करा

10:29 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपला मतदान करा
Advertisement

कारवार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचे आवाहन

Advertisement

कारवार : आमचा देश ‘विश्वगुरु’ व्हायचे दिवस दूर नाहीत. त्यासाठी केवळ गरज आहे ती भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर आणावयाचे आहे, असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केले. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुर्डेश्वर येथे भटकळ मंडळ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये समावेश करण्यात आला होता. उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना कागेरी पुढे म्हणाले, जगातील विकसित आणि बलिष्ठ राष्ट्रांच्या पंगतीत बसण्यासाठी आमच्या देशाची वाटचाल सुरू आहे. विकसित देश हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी देशवासियांनी भाजपला मतदान करून मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. गेल्या चार लोकसभा निवडणुकीत कारवार मतदारसंघातील मतदारांनी भाजपला साथ दिली आहे. गेल्या निवडणुकीत तर भाजपचे उमेदवार तीन लाखाहून अधिक मताधिक्यांनी निवडून आले होते. गेल्या चार निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन कागेरी यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष एन. एस. हेगडे, भटकळचे माजी आमदार सुनील नाईक, माजी मंत्री शिवानंद नाईक, नेते गोविंद नाईक, डॉ. जी. जी. हेगडे, वेंकटेश नाईक, ईश्वर नाईक, लक्ष्मी नारायणसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.