For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोटनिवडणुकांची आज मतमोजणी

06:21 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोटनिवडणुकांची आज मतमोजणी
Advertisement

तीन राज्यांमधील तीन जागांचे निकाल लागणार

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी आज, सोमवारी होणार आहे. गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशातील दंतिया, बिहारमधील बांकीपूर आणि गुजराममधील मंजलपूर मतदारसंघात  मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी केल्यानंतर ईव्हीएम मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते दुपारपर्यंत स्पष्ट निकाल लागण्याची शक्यता आहे.

तीन राज्यांमधील प्रत्येक एका विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले आहे. सर्वाधिक मतदान मध्यप्रदेशातील दंतिया मतदारसंघात झाले असून ते जवळपास 70 टक्के आहे. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात साधारणत: 40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर गुजराममधील मंजलपूर मतदारसंघातही साधाणरत: 40 टक्के मतदान झाले आहे.

दंतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसंदर्भात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. 3 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होण्यापूर्वी, काँग्रेस पक्षाने ईव्हीएमची सुरक्षा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्ट्रॉंग रूमबाहेर अधिकृत प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना चोवीस तास कर्तव्यावर तैनात केले आहे. मतमोजणी संपेपर्यंत प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवले जाईल. काँग्रेसचे उमेदवार कुंवर घनश्याम सिंह यांचे समर्थक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये स्ट्रॉंग रूमच्या आवाराबाहेर उपस्थित आहेत. परिसरात लावलेल्या एलईडी क्रीनद्वारे तेथील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement
Tags :

.