For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालू अर्थसंकल्पात पेन्शनवाढीची तरतूद न केल्यास सरकार विरोधात मतदान करा

12:24 PM Jan 19, 2024 IST | Kalyani Amanagi
चालू अर्थसंकल्पात पेन्शनवाढीची तरतूद न केल्यास सरकार विरोधात मतदान करा
Advertisement

कोल्हापूरात श्रमिक भवन येथे पेन्शनरांच्या मेळाव्यात आवाहन

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

देशातील खाजगी,सहकार,निम सरकारी सेवेतील पेन्शनरांच्या पेन्शन वाढीसाठी केंद्र सरकारने चालू अर्थसंकल्पात तरतूद न केल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सरकार विरोधात मतदान करण्याचा निर्धार पेन्शनरानी करावा असे आवाहन निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीयकार्याध्यक्ष भिमराव डोंगरे यानी केले.

Advertisement

कोल्हापूरात लक्ष्मीपूरीतील 'श्रमिक भवन' येथे कॉ.संताराम पाटील सभागृहात गुरुवार दि. १८ रोजी सकाळी आयोजीत पेन्शनर मेळाव्यात कार्याध्यक्ष डोंगरे बोलत होते ते पुढे म्हणाले कोल्हापूरची छ. शाहूच्या विचारांची भूमीने देशाला यशाचा कल्याणाचा मार्ग दाखवला त्यामुळे या संघर्षशील भूमीतून सरकारने पेन्शनवाढ केली नाही तर त्या सरकारला सत्तेवरून बाजूला करण्यासाठी पेन्शनर तसेच कामावर असणारे कर्मचारी विरोधात मतदान करण्याचा निर्धार पूर्णत्वास नेतील असे सांगितले.

पेन्शनरांचे कामावर रुजू झाल्यापासून प्रत्येक महिन्याला पगारातून पेन्शन फंडासाठी रक्कम कपात होऊन ६० लाख कोटी रुपदावर सरकारकडे ती जमा आहे त्यावर ५१ हजार कोटी रुपयावर व्याज मिळते त्या व्याजातील केवळ १४ हजार कोटी रु. पेन्शनरांना देतात सरकारने निव्वळ मूळ रक्कम तशीच ठेवून व्याजाची रक्कम व दावारहीत ६२ हजार कोटी रु.ची रक्कमेतून सरकारवर कोणताही आर्थिक ताण न पडता पेन्शन वाढ होऊ शकते असे कार्याध्यक्ष भिमराव डोंगरे यानी सांगितले.

पेन्शनवाढीसाठी संपूर्ण देशात निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिती नवी दिल्ली या संघटने सोबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेद्र यादव तसेच प्रा.फंड पेन्शनचे आयुक्त यांच्यासोबत पेन्शन वाढी संदर्भात बैठका झाल्या असून त्याचा अहवाल संसदेपुढे मंजूरीस ठेवला असून संघटनेने प्रतिमाह ९००० रुपये त्याला जोडून महागाई भत्ता देवून पेन्शनवाढ करावी पेन्शनरांना आयुष्यामान भारत योजनेत समावेश करावा अशा मागण्या केल्याचे कार्याध्यक्ष भिमराव डोंगरे यांनी सांगितले.

निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय सदस्य शिवाजी देसावळे यानी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सदस्य शिवाजी सावंत यानी पेन्शनरांच्या व्यथा मांडत पेन्शनवाढ सरकारने केली नाही तर विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.कार्याध्यक्ष भिमराव डोंगरे यांचा एम.टी.डोंगळे यांनी तर सहसचिव पुरषोत्तम हारणे यांचा आनंदा दिडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बी.एस.पाटील, एम.टी. डोंगळे यानी मनोगत व्यक्त केले.आर के पाटील, के. बी. पाटील यासह जिल्ह्यातील पेन्शनर मोठ्या संखेने मेळाव्यास उपस्थित होते.बलदेव चौगले यानी सूत्रसंचलन केले.राष्ट्रीय समन्वयक दिलीप पाटील यानी आभार मानले.

Advertisement
Tags :

.