महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्होंड्रोसोव्हाची स्पर्धेतून माघार

06:43 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अॅडलेड

Advertisement

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या महिलांच्या अॅडलेड आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून विम्बलडन विजेती मर्केटा व्होंड्रोसोव्हाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. या सामन्यात खेळताना व्होंड्रोसोव्हाच्या उजव्या मांडीला स्नायुदुखापत झाली होती. पहिल्या फेरीतील सामना सुरू होण्यापूर्वीच व्होंड्रोसोव्हाने माघारीचा निर्णय स्पर्धा आयोजकाना कळविला.

Advertisement

या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात ओस्टापेंकोने सिरेस्टीचा 2-6, 6-2, 6-4, कॅरोलिना गार्सियाने ऑस्ट्रेलियाच्या प्रेस्टनचा 6-4, 1-6, 6-3, झेकच्या सिनियाकोव्हाने प्लिसकोव्हाचा 6-2, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरूष विभागात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनने अॅकोस्टाचा 6-2, 6-2 असा पराभव केला.

स्टिफेन्स पराभूत

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्लोनी स्टिफेन्सला चीनच्या युईकडून अनपेक्षित हार पत्करावी लागली. चीनच्या युईने हा सामना 6-4, 3-6, 7-6 (7-5) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सहाव्या मानांकित सोफिया केनिनने ग्रीट मिनेनवर 6-3, 6-3 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article