महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वोल्टासने नोंदवला एसी विक्रीत नवा विक्रम

06:50 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक वर्षात 20 लाख एसींची विक्री : समभागाची बल्लेबल्ले

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

एअर कंडिशनर विक्रीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वोल्टासने आर्थिक वर्ष 2024 मध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये वोल्टास कंपनीने 20 लाखहून अधिक एसीची विक्री केली असल्याचे समोर आले आहे. या अंतर्गत एसी विक्रीमध्ये जवळपास 35 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एवढंच नाही चौथ्या तिमाहीत तर एसी विक्रीची विक्री 72 टक्के इतकी वाढलेली होती. इतर कोणत्याही कंपनीने विक्रीत अशी विक्रमी कामगिरी केली नसल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे. होम अप्लायन्सेसची विक्रीही 52 टक्के वाढली आहे.

 कडक उन्हाळ्याचा परिणाम

यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने एसी खरेदीवर ग्राहकांनी अधिक भर दिला असल्याचे पाहायला मिळाले आहे. आर्थिक वर्षांमधील एसी विक्रीची एकंदर आतापर्यंतची तुलना करता 2023-24 आर्थिक वर्षातली विक्री ही आजवरची सर्वोच्च मानली जात आहे. जवळपास 70 वर्षामागे टाटा सन्स आणि बोल वोलकार्ट यांनी एकत्र येत भारतामध्ये वोल्टास या कंपनीची सुरुवात केली होती.

 समभाग चमकला

याचदरम्यान विक्री वाढीच्या बातमीचा परिणाम कंपनीच्या बाजारातील समभागावर दिसून आला. समभाग जवळपास एकावेळी सत्रात 10 टक्के इतका उसळी घेऊ शकला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article