व्हॉलीबॉल : भारतीय पुरुषांचा दुसरा विजय
06:44 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नागोया, (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने सलग दुसरा विजय मिळविताना हाँगकाँगचा 25-22, 25-19, 25-21 अशा सेट्सनी पराभव केला. कर्णधार जेरोम विनितने आघाडीवर राहत मोलाचे योगदान दिले तर त्याला जॉन जोसेफ, अश्वाल राय, चिराग यादव यांनीही उपयुक्त योगदान देत चांगली साथ दिली. भारताची पुढील लढत मंगळवारी कतारविरुद्ध होणार आहे. या लढतीच्या निकालानंतर गट क मधील अग्रस्थानाचा संघ निश्चित होईल.
Advertisement
Advertisement