फोक्सवॅगनने कार्सच्या किमती केल्या कमी
नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी फोक्सवॅगन आपल्या कार्सच्या किमती कमी केल्याची घोषणा केली आहे. कंपनीने सर्वच मॉडेलच्या किमती कमी केलेल्या नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याला जर का आपण कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फोक्सवॅगनच्या कार्स खरेदीचा विचार करता येईल. फोक्सवॅगनने आपल्या काही ठराविक कार्सच्या किमती किमती कमी केल्या आहेत. दुसरीकडे काही मॉडेल्सच्या किमती मात्र वाढवण्यातही आल्या आहेत. कंपनीने आपल्या टायगुन कारची किंमत 84 हजार रुपये कमी केली आहे. आता या कारची किंमत यापुढे 10 लाख 58 हजार रुपये इतकी असणार आहे. टायगुनच्या इतर प्रकारातील कार्सच्या किमती 4000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे फोक्सवॅगनने वर्टूस या कारच्या किमती मात्र 66 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. आता या कारची किंमत एक्स शोरूम 10 लाख 50 हजार रुपये इतकी असणार आहे.