For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभेत मराठी कागदपत्रे देण्यासाठी आवाज उठवला

10:26 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानसभेत मराठी कागदपत्रे देण्यासाठी आवाज उठवला
Advertisement

शिरसी येथील मराठा समाजाच्या सभेत अंजली निंबाळकर यांची माहिती

Advertisement

वार्ताहर /नंदगड

कर्नाटकच्या विधानसभेत कानडी बरोबरच मराठी भाषेत कागदपत्रे द्यावेत म्हणून मी आमदार असताना आवाज उठवला असल्याची माहिती खानापूरच्या माजी आमदार व कारवार लोकसभेच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी शिरसी येथील मराठा समाजाच्या घेतलेल्या बैठकीत दिली. अध्यक्षस्थानी  विरुपाक्ष स्वामीजी होते. यावेळी राष्ट्रीय मराठा मोर्चाचे उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड, खानापूर येथील मराठा समाजाचे नेते व खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. आय. आर. घाडी (खानापूर), मंगला काशिलकर (हल्याळ), खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिरसी तालुका काँग्रेसचे नेते जगदिश गौडा, विनोद साळुंखे (निपाणी) आदींसह विविध भागातील अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंजली निंबाळकर बोलताना म्हणाल्या, मी खानापूरच्या आमदार असताना खानापूर तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहेत. शिवाय खानापूर तालुक्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिक असल्याने त्यांना त्यांच्या भाषेत शासकिय योजनांची माहिती समजावी यासाठा कन्नडबरोबर मराठीतही कागदपत्रे द्यावीत यासाठी मागणी केली होती. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या उन्नतीसाठी मी सदोदीत प्रयत्न करणार आहे. मी एक डॉक्टर असल्याने जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ठिकठिकाणी दवाखान्यांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना अमलात आणणार आहे, असे आाहन केले. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली. या बैठकीला मराठा समाजाचे व अन्य समाजाचे अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.