For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्होडाफोनची थकबाकी 27 टक्के घटवली

06:25 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्होडाफोनची थकबाकी 27 टक्के घटवली
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे थकीत कर्ज 27 टक्क्यांनी घटवत 64 हजार 046 कोटी रुपये इतके दूरसंचार विभागाने केले आहे. यामुळे सोमवारी व्होडाफोन आयडियाच्या समभागाच्या कामगिरीवर गुंतवणुकदारांचे लक्ष राहणार आहे. या आधी थकबाकी 87695 कोटी रुपयांची होती. दूरसंचार विभागाने या संदर्भात कारवाई करताना थकबाकीची रक्कम पुन्हा घटवली आहे.

20236 थकबाकी भरण्यास सुरुवात

Advertisement

31 डिसेंबर 2025 पर्यंत ही थकबाकी कायम राहणार आहे. थकबाकी रक्कम आर्थिक वर्ष 2036 पासून भरण्यास सुरुवात होणार असून 6 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कमेची परतफेड केली जाणार आहे. कंपनीला याकरिता दहा वर्षांचा सवलतीचा अवधी कायम राहणार आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2031-32 पासून आर्थिक वर्ष 2034-35 पर्यंत चार वर्षांत वर्षाला कमीतकमी 100 कोटी रुपये भरणार आहे. यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम आर्थिक वर्ष 2036 पासून 2041 पर्यंत सहा वार्षिक हप्त्याची रक्कम कंपनीला भरावी लागणार आहे.

Advertisement
Tags :

.