जिओ, एअरटेलपेक्षा सरस सेवा व्होडाफोन देणार
विविध पातळ्यांवर बदल करत 5 जी नेटवर्कची सेवा उपलब्ध करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी व्होडाफोन ही जिओ, एअरटेल यांच्यापेक्षा सरस सेवा देण्याच्या तयारीत आहे. क्हीआय लवकरच 5 जी सेवा लाँच करुन वेगवान सेवा देण्यावर काम करणार असल्याची माहिती आहे. जिओ आणि एअरटेल या भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. 5जी नेटवर्क जिओ आणि एअरटेलने काही काळापूर्वी लॉन्च केले आहे, परंतु दुसरीकडे 5 जी नेटवर्कच्या बाबतीत, व्हीआय अर्थात व्होडाफोन आयडिया ही कंपनी खूप मागे राहिली आहे. त्यामुळे ग्राहक अर्थातच वरील दोन कंपन्यांचा पर्याय स्वीकारतात. 5 जी नेटवर्क अद्याप व्हीआयने आपल्या वापरकर्त्यांसाठी लाँच केलेले नाही. तथापि, 5 जी नेटवर्क मार्च 2025 पासून सुरू होणार आहे.
स्वस्त 5जी रिचार्ज योजना सादर करणार व्हीआय
व्हीआयद्वारे 5 जी नेटवर्क सादर करण्यास विलंब झाला असला तरी, असा दावा केला जातो की व्हीआय 5 जी रिचार्ज प्लॅन ऑफर करणार आहे जे जिओ आणि एअरटेलपेक्षा खूपच स्वस्त असेल. व्हीआय भारतातील 75 शहरांमध्ये त्यांचे 5 जी नेटवर्क सादर करू शकते.