व्होडाफोन आयडियाच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया सर्वात मोठा धक्का बसला आहे. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आयडिया यांच्या अडचणी काही संपता संपेनात. 6090 कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याची 10 मार्च ही शेवटची तारीख होती. सरकारने कंपनीला याबाबतीत कोणत्याही प्रकारचा दिलासा नाही. बँक गॅरंटी देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे आता कंपनीला वरीलप्रमाणे पैसे जमा करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. 2015 नंतर कंपनीमार्फत घेतलेल्या स्पेक्ट्रमच्या सुरक्षेसाठी बँक गॅरंटी मागण्यात आली होती. स्पेक्ट्रम पेमेंटसंबंधी गॅरंटीची मागणी सरकारने फेटाळून लावली आहे.
उभारले होते 20 हजार कोटी
कंपनीने मागच्या वर्षी एफपीओ आणि प्रवर्तकांच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारले आहेत. आधीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण बरेच कंपनीने कमी केले आहे. सध्याला कंपनीवर जवळपास 2.1 लाख कोटी रुपयांचे मोठे कर्ज आहे. सरकारने कंपनीला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दर वाढवणार
आता आगामी काळात कंपनी आपल्या दरात वाढ करु शकते. पण असे केल्यास वापरकर्त्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम उमटू शकतो. याचदरम्यान शेअरबाजारात कंपनीच्या समभागावर परिणाम दिसून आला. समभाग 0.5 टक्के इतके घसरलेले दिसून आले.