व्होडाफोन-आयडियाचा तोटा झाला कमी
कमी होत तोटा 3,754 कोटींवर : पहिल्या तिमाहीत महसूलात 6 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था मुंबई
देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी, व्होडाफोन आयडियाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा तोटा कमी होऊन 3,754 कोटींवर आला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 6,608 कोटींचा तोटा झाला होता. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढल्यामुळे आणि 4जी-5जी सेवांमध्ये सामील झालेल्या वापरकर्त्यांमुळे कंपनीचा तोटा कमी झाला आहे. महसूल वाढून 11,660 कोटी झाला आणि इबीआयटीडीएमध्ये 9.1 टक्क्यांची वाढ झाली.
कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा
महसुलात वाढ: व्होडाफोन आयडियाचा एकत्रित महसूल तिमाहीत वाढून 11,660 कोटी झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 11,000 कोटी होता. यात वार्षिक 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. इबीआयटीडीए 5,000 कोटींच्या पार: कंपनीचा इबीआयटीडीए गेल्या वर्षीच्या 4,600 कोटींवरून 9.1 टक्के वाढून 5,034 कोटी झाला.
मार्जिनमध्ये सुधारणा: कंपनीचा इबीआयटीडीए मार्जिन या तिमाहीत 43.17 टक्के नोंदवला गेला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 41.84 टक्के होता.
काय म्हणाले सीईओ
व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ, अभिजित किशोर यांनी आर्थिक निकालांवर आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, आर्थिक वर्ष 2027 हे आमच्यासाठी अंमलबजावणीचे वर्ष आहे. पहिल्या तिमाहीतील ही दमदार कामगिरी आमच्या धोरणाचा आणि शिस्तीचा पुरावा आहे. अभिजित किशोर पुढे म्हणाले की, विलीनीकरणानंतर पहिल्यांदाच आम्ही ग्राहक जोडले आहेत, ही आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. आम्ही ही वाढ पुढेही कायम ठेवू. आमचे 5जी नेटवर्क आता देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये सुरू झाले आहे.