For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ 18 एप्रिलला होणार खुला

06:59 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्होडाफोन आयडियाचा एफपीओ 18 एप्रिलला होणार खुला
Advertisement

18000 कोटी रुपये उभारण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आयडियाचा एफपीओ 18 एप्रिलला खुला होणार आहे. 22 एप्रिलपर्यंत एफपीओ  गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Advertisement

अँकर गुंतवणूकदारांना 16 तारखेला एफपीओमध्ये बोली लावता येणार आहे. 18 हजार कोटी रुपयांची उभारणी या एफपीओमार्फत केली जाणार आहे. कंपनीने एफपीओकरिता 10 ते 11 रुपये प्रतिसमभाग इतकी किंमत निश्चित केली आहे. एका लॉट अंतर्गत 1298 समभागांकरिता गुंतवणूकदारांना बोली लावता येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता कमीतकमी 14278 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन ग्रुपच्या भागीदारीत असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया निधी उभारण्यासाठी नवीन समभाग शेअर्स जारी करणार आहे.  सूत्रांनी सांगितले की कंपनी 18,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर किंवा एफपीओ लॉन्च करेल.

भारतातील सर्वात मोठी ऑफर असेल

जर कंपनीने एफपीओ लाँच केले तर ती आजपर्यंतची भारतातील सर्वात मोठी ऑफर असेल. यापूर्वी, भारतातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेने 15,000 कोटी रुपयांचा एफपीओ लॉन्च केला होता, जो भारतीय बाजारपेठेत कोणत्याही कंपनीने लाँच केलेला सर्वात मोठा एफपीओ आहे.

अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेस जानेवारी 2023 मध्ये 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ लॉन्च करणार होती, त्याच वेळी अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आला आणि अदानी समूहावर काही काळ दबाव होता. नंतर, 2024 च्या सुरुवातीला, समूहाला दिलासा मिळाला आणि आता त्याचे शेअर्स पुन्हा जुन्या स्तरावर परतले आहेत.

गुंतवणूकदार ठरवतात!

व्होडाफोन आयडिया (व्हीआय) ने कथितरित्या परदेशी (एफआयआयएस) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीएलएलएस) सह अँकर गुंतवणूकदारांकडून समर्थन मिळवले आहे, जे एफपीओसाठी लवकर समर्थन दर्शवते.

कंपनीचे संचालक कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, ‘आम्ही व्होडाफोन आयडियासाठी वचनबद्ध आहोत आणि आम्ही जाहीरपणे सांगितल्याप्रमाणे, बाह्य गुंतवणूकदारांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्होडाफोन आयडिया सध्या मोठ्या कर्जाशी झुंजत आहे. कंपनीची ग्राहकसंख्या आणि बाजारातील हिस्साही कमी होत आहे.

Advertisement
Tags :

.