व्होडाफोन-आयडिया एलॉन मस्कना हिस्सा नाही विकणार
एक्सचेंज फायलिंगमध्ये सेबीला दिली माहिती : समभाग 5 टक्क्यांनी घसरणीत
नवी दिल्ली :
व्होडाफोन व आयडिया लिमिटेडने (व्हीआय) एलॉन मस्क यांच्या स्टार लिंक प्रकल्पातील भागभांडवल विकण्याबाबत बोलत असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. व्हीआयने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की कंपनी सेबी लिस्टिंग नियमांचे पालन करेल. या बातमीनंतर व्होडाफोन-आयडियाचे शेअर्स 5 टक्केपेक्षा अधिकने घसरणीत राहिले आहेत. या अगोदर बिझनेस वर्ल्डने 29 डिसेंबर 2023 रोजी अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये कंपनी एलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकशी भागविक्रीबाबत बोलणी करत आहे, म्हटले होते. या अहवालाच्या आधारे सेबीने त्यांचे उत्तर मागितले होते.
समभाग 23 टक्क्यांनी वाढला
व्हीआयचे समभाग हे मागील दोन ट्रेडिंग दिवसांमध्ये 23 टक्क्यांनी वाढले आहेत. 28 डिसेंबर 2023 रोजी ते 13.25 होते, जे 1 जानेवारीला 18.42 च्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.
सप्टेंबर 2023 मध्येही होती बातमी
याआधीही, सप्टेंबर 2023 मध्ये, काही रिपोर्ट्समध्ये अमेरिकन कंपन्या व्हेरिझॉन, अॅमेझॉन किंवा स्टारलिंक व्होडाफोन-आयडियामधील हिस्सा खरेदी करू शकतात. 18 सप्टेंबर रोजी कंपनीने हे अहवाल चुकीचे घोषित केले.