For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वोडाफोन आयडियाचा समभाग चमकला

07:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
वोडाफोन आयडियाचा समभाग चमकला
Advertisement

मुंबई : गुरुवारी शेअरबाजारात दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडियाचा समभाग 7 टक्के इतका वाढलेला दिसून आला. सलग तिसऱ्या शेअरबाजाराच्या सत्रात समभाग तेजी राखून आहे. कंपनी आपल्या व्यवसाय विस्तारासाठी भागीदारीवर भर देत आहे. तेजस नेटवर्क, एचएफसीएल व एचसीएलटेक यांच्यासोबत कंपनीने भागीदारी करुन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 4जी व 5 जी पायाभूत सुविधांचे जाळे पसरवण्यासाठी कंपनी नेटाने प्रयत्न करते आहे. तेजस नेटवर्क्ससोबत कंपनी 4जी व 5 जी वायरलेस उपकरणांची चाचणी घेत आहे. 17 सर्कलमध्ये सध्या या सेवा देण्यासाठी कंपनीचे शर्थीचे प्रयत्न असून येत्या काळात नेटवर्क सेवेत सुधारणा करण्यात येणार आहेत. या सेवा विस्तारासाठी कंपनीने 3.6 अब्ज डॉलर्सचा 2024 मध्ये नोकीया, इरीक्सन व सॅमसंगसोबत 3 वर्षासाठी करार केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.