वोडाफोन आयडियाचा समभाग वधारला
06:10 AM Dec 03, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी वोडाफोन आयडियाचा समभाग मंगळवारी 4 टक्के वाढत 10.32 रुपयांवर पोहचला आहे. सदरच्या समभागाची कामगिरी ही गेल्या दोन सत्रातील घसरणीनंतर नोंदली गेली आहे. समभाग वाढण्यामागे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे सकारात्मक वक्तव्य होते. केंद्र सरकार एजीआर थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंपनी आपला यासंबंधातला प्रस्ताव पाठवणार असून त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या वक्तव्याचा परिणाम मंगळवारी शेअरबाजारात कंपनीच्या समभागावर दिसून आला. समभाग जवळपास 4 टक्के तेजीत राहिला होता.
Advertisement
Advertisement
Next Article