व्होडाफोन-आयडियाला जीएसटी नोटीस
कंपनीला जवळपास 638 कोटींचा दंड
अहमदाबाद :
व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) ला अहमदाबाद येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्त कार्यालयाकडून सुमारे 638 कोटी रुपयांची दंडाची नोटीस मिळाली आहे. व्होडाफोन-आयडिया म्हणते की ते या कर मागणीशी सहमत नाही आणि त्याविरुद्ध कायदेशीर लढा देणार आहे.
कर कमी भरल्याचा आणि चुकीच्या इनपुट क्रेडिटचा आरोप अहमदाबाद अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात व्होडाफोन-आयडियाने कमी कर भरल्याचा आरोप आहे. यासोबतच, कंपनीवर इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा जास्त वापर केल्याचाही आरोप आहे.
हे आदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 74 अंतर्गत जारी करण्यात आले आहे. त्यांनी थकित कर आणि त्यावरील व्याजासह 6,37,90,68,254 दंडाची मागणी केली आहे. यावर कंपनीने म्हटले आहे, की ‘आम्ही या आदेशाशी सहमत नाही, आम्ही त्याला आव्हान देऊ.’
वृत्तसंस्था एएनआय आणि पीटीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजीआरचे पेमेंट आता आर्थिक वर्ष 2032 ते 2041 दरम्यान 10 वर्षांच्या कालावधीत केले जाईल. एजीआर हा टेलिकॉम कंपन्यांच्या महसुलाचा वाटा आहे ज्यावर सरकार परवाना शुल्क आकारते.