For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवो एक्स 80, एक्स 80 प्रो स्मार्टफोन दाखल

07:00 AM May 20, 2022 IST | Tarun Bharat Portal
विवो एक्स 80  एक्स 80 प्रो स्मार्टफोन दाखल
Advertisement

मुंबई : विवो कंपनीने आपला नवा विवो एक्स 80 व एक्स 80 प्रो हे स्मार्टफोन नुकतेच लाँच केले आहेत. सदरच्या स्मार्टफोन्सची किंमत 54 हजाराच्या पुढे असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

विवो एक्स 80 प्रो हा स्नॅपडॅगन 8 जीइएन 1 प्रोसेसरसह येणार असून यात ऍडव्हान्स इमेजिंग सिस्टमची सोय आहे. कमी प्रकाशात फोटोग्राफी व व्हिडीयोग्राफी उत्तमपणे यावर करता येते, असा दावा कंपनीचा आहे.  एक्स प्रो हा 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येत असून 79 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत असेल. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टारेजच्या फोनकरीता 54 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रो कॉस्मीक ब्लॅक रंगात येतो तर एक्स 80 कॉस्मिक ब्लॅक व अर्बन ब्ल्यू रंगात उपलब्ध होणार आहे. दोन्हीही फोन 25 मे पासून फ्लिपकार्ट, विवो इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवर तसेच देशभरातील विक्री केंद्रांवर खरेदीकरीता उपलब्ध असणार आहे.

वैशिष्टय़े

Advertisement

  •  6.78 इंचाचा अमोलेड डिस्प्ले, 9 जीइएन 1 प्रोसेसर
  •  32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
  •  4 हजार 700 एमएएच बॅटरी, 80 वॅट फास्ट चार्जर
  •  219 ग्रॅम वजन
Advertisement
Tags :

.