विवो एक्स 200 टी स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्रसिद्ध टेक कंपनी विवो यांनी भारतीय बाजारात आपला नवीन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन विवो एक्स 200 टी लाँच केला आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे 100 एक्स डिजिटल झूमसह त्याचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स, मीडियाटेक डायमेंशन 9400 पेक्षा अधिकचा प्रोसेसर आणि मोठी 6200एमएएच क्षमतेची बॅटरी राहणार आहे. स्मार्टफोनच्या या मालिकेतील हे चौथे मॉडेल आहे, याआधी कंपनीकडून एक्स200. एक्स200 एफइ आणि एक्स200 प्रो हे भारतात सादर करण्यात आले आहेत. विवो एक्स 200 टी दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 256 जीबी मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे. विवो एक्स200 टी सेल 3 फेब्रुवारीपासून सुरू होईल. लाँच ऑफरमध्ये त्यावर 5,000 ची बँक सूट उपलब्ध असेल. विवो एक्स200 टी हा नव्याने दाखल झालेला स्मार्टफोन बाजारात मोटोरोला सिग्नेचेर (किंमत 59,999) आणि वन प्लस 15 आर (किंमत 47,999) शी स्पर्धा करेल.
डिझाइन : प्रीमियम ग्लास बॉडी आणि आयपी69 रेटिंग फोनची डिझाइन खूपच आकर्षक आणि आधुनिक आहे. त्याच्या बॅक पॅनलमध्ये एक मोठा वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे जो टेक्सचर्ड फिनिशसह येतो.
मटेरियल आणि रेटिंग : फोनमध्ये मेटल फ्रेम आणि प्रीमियम ग्लास वापरला जातो. डिस्प्ले आणि बेझल्स: समोर अतिशय पातळ बेझल्ससह 1.5 फ्लॅट डिस्प्ले आहे. त्यात सेंटर पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे.