17 फेब्रुवारी रोजी विवो व्ही50 होणार लाँच
ट्रान्सलेशन आणि सर्कल टू सर्च, 50 एमपी कॅमेऱ्यासारखी एआय फिचर्स मिळणार
नवी दिल्ली :
चीनी टेक कंपनी विवो भारतीय बाजारात नवीन व्ही आवृत्तीचा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. विवो व्ही50 हा 5 जी मध्ये स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्ट असिस्ट, सर्कल टू सर्च आणि गुगल जेमिनी सारखी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) फीचर्स मिळतील.
कंपनीने या फोनचे उत्पादन पृष्ठ त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह केले आहे. 91 मोबाईल्सच्या मते, कंपनी 17 फेब्रुवारी रोजी भारतात हा फोन लाँच करणार आहे आणि 24 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. विवो व्ही50 हा 5 जी स्मार्टफोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन, एआय ट्रान्सक्रिप्ट असिस्ट, सर्कल टू सर्च आणि गुगल जेमिनी सारख्या एआय फीचर्स मिळतील.
यासोबतच 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला हा भरतातील सर्वात स्लीक फोन असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. यात पिल-साइज एम्बॉस्ड कॅमेरा मॉड्यूल आहे. या मॉड्यूलच्या वरच्या बाजूला दोन कॅमेरा सेन्सर दिले आहेत. स्मार्टफोन रोझ रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये येईल.