विवो व्ही 50 भारतात लाँच, एआय वैशिष्ट्यांचा समावेश
50 एमपी कॅमेऱ्यासह किमत 35 हजाराच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी स्मार्टफोन कंपनी विवोचा नवा विवो व्ही50 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जन थ्रीचिपसह हा स्मार्टफोन असून याला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 35 हजाराच्या घरात असणार आहे.
दोन फोन लाँच
महत्त्वाचे म्हणजे याचा कॅमेरा हा जर्मन चष्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी झीस यांनी विकसीत केलेला आहे. शिवाय कृत्रिम बुद्धिमता म्हणजेच एआयने हा स्मार्टफोन युक्त असेल. यातील 8 जीबी रॅम व 128 जीबीच्या फोनची किंमत 34,999 रुपये, 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 36,999 रुपये तर 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 40,999 रुपये असेल.
मिळणार सवलतीत
रोस रेड, स्टारी नाइट व टिटॅनियम ग्रे या तीन रंगात फोन येणार असून ठराविक रिटेल स्टोअर्सवर, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर हा फोन प्री बुकिंग करुन खरेदी करता येतो. सुरुवातीच्या खरेदीदारांना 10 टक्केपर्यंत सवलत मिळणार असल्याचे कळते. इएमआय आधारावरही हा फोन खरेदी करण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध केली आहे.
उत्तम कॅमेऱ्यासह एआयची ही वैशिष्ठ्यो
यात 50 एमपीचा मेन कॅमेरा, 50 एमपीचा फ्रंट फेसिंग कॅमेरा एआय फीचरसह असेल. अँड्रॉइड 15 वर चालणारा फोन लाइव्ह कॉल ट्रान्स्लेशन, एआय ट्रास्क्रीप्ट असिस्ट, एआय स्क्रीन ट्रान्स्लेशन, सर्कल टू सर्च यासारख्या एआय फीचर्ससह येणार आहे.
वैशिष्ट्यो...
विवो व्ही 50
प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जन 3
रॅम : 12 जीबीपर्यंत
स्टोरेज : 512 जीबीपर्यंत
रिअर कॅमेरा : 50 एमपी अधिक 50 एमपी अल्ट्रावाइड
फ्रंट कॅमेरा : 50 एमपी
बॅटरी : 6000 एमएएच
चार्जिंग : 90 डब्ल्यू वायर्ड