10 हजार एमएएचच्या दमदार बॅटरीचा विवोचा नवा फोन लाँच
एस 2 एफइ 5जी स्मार्टफोन दाखल : 39 हजाराच्या आत किमत
वृत्तसंस्था, मुंबई
विवो या कंपनीने भारतात एस 2 एफइ हा 5 जी स्मार्टफोन लाँच केला असून महत्त्वाचे म्हणजे हा फोन 10 एमएएच क्षमतेच्या दमदार बॅटरीसोबत आला आहे. या फोनची किमत 39 हजार रुपयांच्या घरात असणार आहे. यात 6.83 इंचाचा अमोलेड डिस्प्ले स्क्रीन दिला असून मीडियाटेक डायमनसिटी 7300 इ 5जी चिपसेट असेल.
6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 38,999 रुपये असणार असून तर 8 जीबी व 129 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत मात्र 42,999 रुपये असेल, असे म्हटले जात आहे. स्टेलर ग्रीन, टायटन ब्लॅक व झेन व्हाइट या 3 रंगात फोन येणार असून 20 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट, अमेझॉन, विवो इंडिया या संकेतस्थळावर विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे. ड्युअल सीमचा हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारीत ओरीजीन ओएस 6 वर चालतो.
कॅमेरा कसा असणार
फोटोग्राफीबाबत विचार कराल तर यात 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमक्स 852 मेन सेन्सर
कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी व व्हिडीयो कॉलकरीता 32 एमपीचा फ्रंट
कॅमेरा असेल. धूळ, पाणीरोधक असा हा फोन आहे. 10 हजार एमएएचची बॅटरी
यात असून 44 डब्ल्यूचा वायर्ड चार्जर आहे.
