विवो 200 प्रो मिनी लवकरच होणार लाँच
एक्स200 सिरीजमधला तिसरा फोन: 70 हजार असणार किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनी स्मार्टफोन कंपनी विवोचा एक्स सिरीजचा एक्स 200 प्रो मिनी हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. एप्रिल ते जून 2025 या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा सदरचा तिसरा स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवला जाण्याची शक्यता आहे. सदरचा फोन हा चीनमध्ये लाँच करण्यात आला असून याआधी एक्स 200 आणि एक्स 200 प्रो हे दोन फोन ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच केले गेले होते. हे दोन फोन भारतीय बाजारात मात्र डिसेंबर 2024 मध्ये उपलब्ध झाले होते.
फोनमधील वैशिष्ट्यो..
विवो एक्स200 मिनी हा 6.31 इंचाच्या एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले स्कीन येणार असून मीडियाटेक डायमनसिटी 9400 ची चिप यात असेल. हा फोन ओएस 5 वर ऑपरेट होणार असून 50 मेगापिक्सलचा कॅमेरा यात असणार असल्याचे समजते. शिवाय बॅटरी ही 5700 एमएएच क्षमतेची असणार असून सोबत 90 डब्ल्यूचा फास्ट चार्जरही दिमतीला असेल. याशिवाय इतर काही वैशिष्ट्यो ही याआधीच्या दोन एक्स200 सिरीजप्रमाणेच असतील, असे समजते. मिळालेल्या माहितीनुसार सदरचा नवा एक्स200 प्रो मिनी स्मार्टफोनची किंमत भारतात 70 हजार पर्यंत असू शकते, असेही म्हटले जात आहे.