For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवेक रामास्वामी ओहायोमधून लढणार

06:24 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
विवेक रामास्वामी ओहायोमधून लढणार
Advertisement

गव्हर्नर पदासाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकन उद्योगपती आणि ट्रम्प समर्थक विवेक रामास्वामी यांनी ओहायो गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे तिकीट मिळवले आहे. आता नोव्हेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार एमी अॅक्टन यांच्याशी होईल. रामास्वामी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा मिळाला असून, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी स्वत: त्यांच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. अलिकडच्या वर्षांत रिपब्लिकन पक्षाने ओहायोमध्ये आपली पकड मजबूत केली असून त्याचा फायदा त्यांनाही होत आहे.

Advertisement

रामास्वामी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीतही चर्चेत होते, पण नंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांनीही त्यांच्या उमेदवारीचे उघडपणे कौतुक करताना त्यांना एक मजबूत उमेदवार म्हटले होते. तिकीट मिळवण्याच्या आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान, रामास्वामी यांनी स्वत:च्या पक्षाऐवजी थेट डेमोक्रॅटिक उमेदवार अॅक्टन यांना लक्ष्य केले होते. अॅक्टन यांनी कोविड-19 महामारीच्या काळात ओहायोच्या सार्वजनिक आरोग्य संचालक म्हणून काम केले होते. आता त्या राज्याला अधिक सुलभ बनवण्याच्या आश्वासनावर निवडणूक ते लढवणार आहेत.

Advertisement
Tags :

.