कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी यादीत विवेक दुबे

05:58 PM May 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे माजी विद्यार्थी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी: कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी २०२५साठी परीक्षकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये भारतातील सहा प्रतिभावान क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित यादीत बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथील एप्लाइड आर्ट शाखेचे माजी विद्यार्थी विवेक दुबे यांचीही ‘फिल्म क्राफ्ट लायन्स’ विभागात परीक्षक म्हणून निवड झाली आहे. ही संपूर्ण कॉलेजसाठी अभिमानाची बाब आहे.विवेक दुबे हे सध्या ‘मंजुमा’ या प्रोडक्शन हाऊसचे दिग्दर्शक म्हणून कार्यरत असून, चित्रफितीतील उत्कृष्ट सादरीकरण, कथाकथन आणि तांत्रिक कसोट्यांवर आधारित मूल्यांकनासाठी ते परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.इतर भारतीय परीक्षकांमध्ये नेव्हिल शहा (एफसीबी किनेक्ट – ब्रँड एक्सपीरियन्स अ‍ॅन्ड अ‍ॅक्टिवेशन), अरुण अय्यर (स्प्रिंग मार्केटिंग कॅपिटल – क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी), प्रजतो गुहा ठाकुरता (मांजा – डायरेक्ट), रजिका मित्रा (हवस प्ले इंडिया – एंटरटेन्मेंट) आणि अर्णब रे (लँडर इंडिया – इंडस्ट्री क्राफ्ट) यांचा समावेश आहे.भारतीय क्रिएटिव्ह क्षेत्राचा जागतिक व्यासपीठावर वाढता प्रभाव अधोरेखित करणारी ही निवड देशासाठी आणि विशेषतः सावंतवाडी व बी. एस. बांदेकर कॉलेजसाठी गौरवाची गोष्ट आहे.महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री रमेश भाट, प्राचार्य श्री उदय वेले, अध्यापक वर्ग यांनी विवेक दुबे यांचे अभिनंदन केले आहे .

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article