For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News | आषाढीसाठी लंडन येथून येणार विठ्ठलाची पालखी

01:08 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pandharpur news   आषाढीसाठी लंडन येथून येणार विठ्ठलाची पालखी
Advertisement
लंडन येथून पंढरपूर येथे विठ्ठल भक्ताची दिंडी येणार
पंढरपूर : देहू, आळंदी व विविध ठिकाणांहून संतांचे पालखी सोहळे आषाढी यात्रेसाठी येतात. मात्र, यंदाच्या वर्षी लंडन येथून पंढरपूर येथे विठ्ठल भक्ताची दिंडी येणार आहे. यामुळे विठ्ठलाची भक्ती सातासमुद्रापार पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.

देहू येथून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ७ जुलै तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे. संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असून हरिनामाचा गजर करत हा पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे. तसेच विविध गावांतून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

Advertisement

 याच धर्तीवर लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी आषाढी यात्रेसाठी येणार आहे. ही दिंडी ११ देश व ५० दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. लंडन येथून ही दिंडी ६ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. ११ देश व ५० दिवसांचा प्रवास करून हा दिंडी सोहळा २६ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.
 

ही दिंडी लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक, रिपब्लिकन हंगेरी, तुर्की, जॉर्जिया आदी देशांतून भारतात येणार असून पंढरपुरात दाखल होणार आहे. या दिंडीचे आयोजन अनिल खेडकर या मराठी भक्ताने केले आहे. विठ्ठलाचे भक्त भारतात आहेत. तसेच हे भक्त आता सातासमुद्रापार असल्याचे दिसून येत आहे. संतांच्या पालखी सोहळ्याबरोबरच आता लंडन येथून पंढरपुरात पालखी सोहळा येणार आहे.

समतेचा संदेश देता यावा या हेतूने ग्लोबल वारी
मागील वर्षी लंडन येथील श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांनी पंढरपूर येथून चांदीच्या श्री विठ्ठल पादुका सुमारे ५५ देश आणि ९० दिवसांचा प्रवास करत लंडन येथे आणल्या होत्या. पंढरीचे नाममहात्म्य सर्व जगभरात पोहोचावे, वारकरी संप्रदायाची पताका जगभरात फडकावी, समतेचा संदेश देता यावा या हेतूने ग्लोबल वारी सुरू करण्यात आली असून लवकरच लंडन येथे भव्य असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारण्यात येणार आहे.
 

Advertisement

 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.