For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : विठ्ठलापूर येथे हातभट्टी उद्ध्वस्त, एक हजार लीटर रसायन नष्ट 

11:24 AM Jun 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sangli news   विठ्ठलापूर येथे हातभट्टी उद्ध्वस्त  एक हजार लीटर रसायन नष्ट 
Advertisement
आटपाडी : विठ्ठलापूर येथे हातभट्टी उध्वस्त करत पोलिसांनी तब्बल एक हजार लीटर कच्चे पक्के रसायन नष्ट केले. हातभट्टी चालक धनाजी तानाजी मंडले (विठ्ठलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे येथे विषारी दारुने मोठे कांड घडल्यानंतर सांगली जिल्ह्यात हातभट्टी विरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली.
पोलीस अधीक्षक सांगली तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनय बहिर, पोहेकॉ फकीर, पोहेकॉ टार्फे, पोहेकॉ पाटील, चापोहेकॉ कदम यांनी विठ्ठलापूर येथे हातभट्टीवर छापा टाकला.
विठ्ठलापूर गावच्या हद्दीत आवळाई ते विठ्ठलापूर जाणाऱ्या ओढ्याच्या काठावर धनाजी तानाजी मंडले हा हातभट्टीची काढीव दारू भट्टी लावत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. आटपाडी पोलिसांच्या पथकाने छापा टाकताच धनाजी मंडले पळून गेला. घटनास्थळी ८०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर जळके रसायन, प्लॅस्टीकचे ४ बॅरेल, ३ मण लाकडे असा एकुण ३७ हजार २०२ रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Advertisement
Advertisement
Tags :

.