विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेसाठी 26 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी
या पूजेसाठी 2,100 रुपये इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यातील गर्दीचे दिवस तसेच सण-उत्सवांचे दिवस वगळून भाविकांना तुळशी अर्चन पूजेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी
तुळशी अर्चन पूजेसाठी भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://online.vitthalrukminimandir.org.in/#/login या लिंकवरून नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणीसाठी मदत आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पूजेसंदर्भातील सविस्तर माहिती, नियम आणि अटी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.
