कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विठ्ठल कदम यांचा 'चिमण कथा' बालकथा संग्रह शैक्षणिक अभ्यासक्रमात

03:52 PM Jul 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बालसंग्रह दाखल

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
शिक्षक साहित्यिक तथा कुणकेरी शाळा नं १ चे मुख्याध्यापक विठ्ठल नारायण कदम यांच्या चिमण कथा या बालकथा संग्रहाची अभ्यासक्रमात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण परिषदेने ही निवड केली आहे. शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यावतीने शिक्षक लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची रुची निर्माण करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथ निर्मिती उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात विठ्ठल कदम यांचा चिमण कथा हा बालांच्या भाव विश्वावर आधारित ४० बालकथांचा कथासंग्रह शासनाच्यावतीने निर्माण करण्यात आला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयात दाखल झाला असून महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने याचे स्वागत केले आहे. चिमण कथा या पुस्तकात चिमण हा मुलगा नायक असून त्याच्या भोवतालचे जग आणि त्याची निरीक्षणे नोंदवतो. या पुस्तकात चिमण हा मुलगा पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांची संवाद साधताना दिसतो. महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विठ्ठल कदम यांचा यापूर्वीही एकदा काय झाले? हा कथासंग्रह, चार पावलं दूर.. हा बालक कादंबरी, व तुझा पदर तिरंगा हे बालसाहित्य प्रकाशित झाले असून रूमणी हा काव्यसंग्रह साहित्य क्षेत्रात गाजलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मनोहर परब आणि रामजी पोळजी यांचेही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. विठ्ठल कदम हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून नाविन्य शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या बालसंग्रहाची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article