For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल कदम

04:57 PM Jul 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल कदम
Advertisement

तर सरचिटणीसपदी जे. डी. पाटील यांची निवड

Advertisement

ओटवणे| प्रतिनिधी
राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल कदम तर जिल्हा सरचिटणीस पदी जे. डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मालवण येथील रघुनाथराव देसाई विद्यालयाच्या सभागृहात मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघाच्या मेळाव्यात संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष विठ्ठल कदम, जिल्हा सरचिटणीस जे.डी.पाटील, राज्य सल्लागार व जिल्हा नेते शिवराज सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष स्नेहलता राणे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद बामणीकर, संजय रासम, प्रदिप मांजरेकर, सुषमा मांजरेकर, प्रसिद्धी प्रमुख उदय गोसावी, जिल्हा संघटक आनंद जाधव, श्यामसुंदर सावंत, जिल्हा सल्लागार संजीव राऊत, प्रकाश सावंत, प्रकाश घोगळे ,रावजी परब, नंदन घोगळे, सोनाली सावंत, किशोर वालावलकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा संघटनेच्या वतीने शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून राज्य व राष्ट्रीय पुरस्कार आदर्श शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी राबविलेल्या विद्यार्थी हिताच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. नुतन‌ कार्यकारिणीचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.