Pandharpur | विठुरायाला आता शीतल लेप; गुढीपाडव्यापासून पंढरपुरात 'चंदन उटी' पूजेला प्रारंभ
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या 'चंदन उटी' परंपरेची तयारी सुरू
पंढरपूर - बाढत्या उन्हापासून त्रास होवू नये यासाठी प्रत्येक वर्षी मंदिर समितीकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस चंदन उटी पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा ते मृग नक्षत्रापर्यंत रोज चंदन उटी पूजा होईल. विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी २१ हजार तर रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी ९ हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती, मंदिर समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली उन्हाळ्यामध्ये सूर्यनारायण रौद्ररुप धारण करीत असल्यामुळे
येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. यामुळे उकाड्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीस त्रास होवू नये यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल-रुक्मिणीस चंदन उटी पूजा करण्याची परंपरा आहे. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदन उटी पूजेसाठी लागणारे चंदन दरवर्षी मंदिर समिती कर्नाटकातून खरेदी करीत असते.
दरवर्षी गुढीपाडवा ते मृगनक्षत्र निघेपर्यंत (अर्थात ७ जून) दररोज दुपारी चार वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस चंदन उटी केली जाते.त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेस गायीच्या तुपातला गोडाचा शिरा, पोहे, बाटली डाळ, सुकामेवा,
उन्हाळ्यात चार महिने केली जाते चंदन उटीविठ्ठल रूक्मिणी मातेस उन्हाळ्याच्या तीव्र झळांचा त्रास कमी व्हावा यासाठी उन्हाळ्यात चार महिने चंदन उटी केली जाते. ही शेकडो वर्षांची परंपरा असून सहाणेवर चंदन उगाळून त्याचा थंडगार लेप श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस लावला जातो.
चंदन उगाळण्यासाठी साडे तीन ते चार तास लागतात. यासाठी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथून चंदन मागविले जाते.कैरीचे पन्हे, लिंबू सरबत यांचा नैवेद्य देखील दाखविण्यात येतो. दरम्यान विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी यावर्षी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेच्या चंदन उटी पूजेसाठी ९ हजार रुपये इतके देणगी शुल्क मंदिर समितीकडून आकारण्यात आलेले आहे. सध्या मंदिर समितीकडून चंदनउटी पूजेची तयारी सुरुकरण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली आहे. चंदन उटी पूजा करण्यासाठी भाविकांकडून अर्ज मागविले जातात. यावर्षी गुढीपाडवा गुरुवार, १९ एप्रिलला आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापासून चंदन उटी पूजेस सुरुवात करण्यात येणार आहे.