त्वचा, केस आणि स्नायूसाठी उपयुक्त व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई त्वचा, केस आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते. हे जीवनसत्व नियमितपणे शरीरात गेल्यास म्हातारपणातही शरीर मजबूत होते. पण हल्ली व्हिटॅमिन ई साठी अनेकदा गोळ्या खाल्ल्या जातात. पण घरच्या घरी रोजच्या आहारातून हि आपल्याला व्हिटॅमिन ई मिळू शकते. त्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे हे आज आपण जाणून घेऊयात.
शेंगदाणे खाणे कोणाला आवडत नाही? अनेकांना माहित नसेल की, हे नट व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत आहे. प्रत्येक १०० ग्रॅममध्ये २.२ मिलीग्राम व्हिटॅमिन ई उपलब्ध आहे. शेंगदाणे जरी तुम्ही नियमित खाल्ले तरी शरीराच्या जीवनसत्वाच्या गरजा पूर्ण होतात.
बदाममध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. ड्राय फ्रुट्समध्ये बदाम हा सोपा पर्याय आहे. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
शिजवलेल्या पालकाच्या एका कपमध्ये १.९ मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते. तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात पालकाचा समावेश करू शकता. तुम्ही हे भाजी किंवा सलाद म्हणून खाऊ शकता.