For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विस्ताराचे शेवटचे उड्डाण 11 नोव्हेंबर रोजी

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
विस्ताराचे शेवटचे उड्डाण 11 नोव्हेंबर रोजी
Advertisement

3 सप्टेंबरपासून तिकीट आरक्षण बंद : एअर इंडियाचे अंतिम विलीनीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

देशातील तिसरी सर्वात मोठी एअरलाइन, विस्तारा, 11 नोव्हेंबर रोजी शेवटची फ्लाइट चालवणार आहे. कारण सिंगापूर-आधारित एअरलाइनचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण अंतिम झाले आहे. 12 नोव्हेंबरपासून विस्ताराची सर्व उड्डाणे आता एअर इंडियाद्वारे चालवली जातील. त्यासाठीची तिकिटेही एअर इंडियाच्या वेबसाइटवरून बुक केली जाणार आहेत. विस्ताराने शुक्रवारी ही माहिती दिली. विमान कंपनीने म्हटले आहे की 12 नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी 3 सप्टेंबरपासून कंपनीच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग बंद होईल. विस्तारा 11 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग घेणे आणि प्रवासासाठी फ्लाइट चालवणे सुरू ठेवेल.

Advertisement

एअर इंडिया-विस्तारात नोव्हेंबर-2022 विलीनीकरणाचा करार

एअरइंडिया आणि विस्तारामधील या विलीनीकरणाच्या करारावर नोव्हेंबर 2022 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. विलीनीकरणास भारतीय नियामक स्पर्धा आयोगाकडून सप्टेंबर 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, सिंगापूरच्या स्पर्धा आणि ग्राहक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला विलीनीकरणास मंजुरी दिली. या विलीनीकरणानंतर, एअर इंडिया समूह ही देशांतर्गत दुसऱ्या क्रमांकाची आणि बाजारपेठेतील हिश्श्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनली आहे. टाटा 74.9 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्स 25.1 टक्के या करारानंतर, सिंगापूर एअरलाइन 250 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,096 कोटी रुपये) च्या थेट गुंतवणुकीसह एअर इंडिया समूहातील 25.1 टक्के हिस्सा धारण करेल. नवीन उपक्रमात टाटा समूहाचा 74.9 टक्के हिस्सा राहणार आहे.

Advertisement
Tags :

.