For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 मध्ये व्हिसेरचा नवा विश्वविक्रम, षटकात 39 धावा

06:12 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी 20 मध्ये व्हिसेरचा नवा विश्वविक्रम  षटकात 39 धावा
Advertisement

युवराज सिंगचा विक्रम मोडित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

क्रिकेटच्या टी-20 या प्रकारात सामोआ संघातील मध्यफळीत खेळणारा फलंदाज डॅरीयस व्हिसेरने येथे मंगळवारी झालेल्या विश्वचषक इस्ट आशिया-पॅसिफिक विभागाच्या पात्रता स्पर्धेतील सामन्यात एका षटकात 39 धावा झोडपण्याचा नवा विश्वविक्रम केला.

Advertisement

मंगळवारच्या सामन्यात सामोआ संघाकडून खेळताना 28 वर्षीय व्हिसेरने नलिन निपको याच्या एका षटकात 39 धावा झोडपल्या. निपकोचे हे षटक 9 चेंडूचे झाले. व्हिसेरचा हा केवळ तिसरा टी-20 सामना आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यू साऊथ वेल्समधील हिपे क्रिकेट अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळविला गेला. व्हिसेरने या सामन्यात 62 चेंडूत 5 चौकार आणि 14 षटकारांसह 132 धावा झोडपल्या. सामोआ आणि व्हेनॉटू यांच्यात हा सामना खेळविला गेला. पण सामोआने हा सामना 10 धावांनी जिंकला. सामोआने 20 षटकात सर्वबाद 174 धावा जमविल्यानंतर व्हेनॉटूने 20 षटकात 9 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती.

टी-20 प्रकारामध्ये या पूर्वी म्हणजे 2007 साली झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू युवराज सिंगने स्टुअर्ट ब्dरॉडच्या एका षटकात 6 षटकारांसह 36 धावा झोडपल्या होत्या. युवराज सिंगचा विक्रम व्हिसेरने मोडीत काढला आहे. क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारात आतापर्यंत पाच गोलंदाजांनी आपल्या एका षटकात 36 धावा दिल्या आहेत. 2007 साली इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने, 2021 साली लंकेच्या अकिला धनंजयने, 2024 साली करिम जेनतने, 2024 साली कमरान खानने तर 2024 साली अफगाणच्या अझमतुल्ला ओमरझाई यांनी आपल्या एका षटकात 36 धावा दिल्या होत्या. विंडीजच्या किरॉन पोलार्डने, लंकेच्या अकिला धनंजयच्या एका षटकात 36 धावा जमविल्या होत्या. एसीसी प्रिमीयर चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात विंडीजच्या पुरनने अफगाणच्या ओमरझाईच्या एका षटकात 6 षटकार खेचले होते. त्याचप्रमाणे भारताच्या रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी अफगाणच्या करिम जेनतच्या एका षटकात 36 धावा झोडपल्या होत्या.

Advertisement
Tags :

.