For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगाई यात्रेनिमित्त प्रमुख मंदिरांना भेटी

11:28 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंगाई यात्रेनिमित्त प्रमुख मंदिरांना भेटी
Advertisement

कलश घेऊन कुमारिका सहभागी

Advertisement

बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगाई देवीची यात्रा जुलै अखेरीला होणार आहे. या निमित्ताने वडगाव परिसरातील कुमारिकांनी मंगळवारी पहिल्या वारानिमित्त गावातील प्रमुख मंदिरांना भेटी देऊन कलशातून आणलेले पाणी वाहिले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कुमारिका उपस्थित होत्या. वडगावमधील प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीला शुक्रवारी गाऱ्हाणे घालण्यात आले. गाऱ्हाणे घातल्यानंतर पुढील महिनाभर गावात वार पाळले जातात. मंगळवारी पहिला वार असल्याने परंपरेप्रमाणे कुमारिकांनी देवांना पाणी वाहण्यासाठी गर्दी केली होती. धनगरी ढोल वादन करत मंगाई मंदिरापासून गावातील प्रमुख मंदिरांना भेटी देण्यात आल्या. डोक्यावर कलश घेऊन कुमारिका सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मंदिरामध्ये कलशातील पाणी घालण्यात आले. यावेळी हक्कदार चव्हाण-पाटील यांच्यासमवेत वडगावमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.