For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली ग्रामपंचायतीला डीआयजी पवनकुमार यांची भेट

11:33 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली ग्रामपंचायतीला डीआयजी पवनकुमार यांची भेट
Advertisement

वार्ताहर/कडोली

Advertisement

निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त झालेले उत्तरप्रदेशचे डीआयजी पवनकुमार यांनी कडोली ग्रा.पं.ला भेट देवून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मतदानाविषयी माहिती जाणून घेतली. येत्या दि. 7 मे रोजी चिक्कोडी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया कशी पार पडते. मतदानादिवशी कामे कशी करावीत, कोणत्या अनुचित घटनेची शक्यता आहे काय? मतदारांची प्रतिक्रिया काय? बुथप्रमाणे निवडणूक सुरळीत पार पडते काय, या भागाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी याकरिता माहिती घेतली. त्यांच्याबरोबर काकती पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश एम., एएसआय बसवराज लमाणी आणि सहकाऱ्यांची उपस्थिती होती. पीडीओ कृष्णाबाई भंडारी यांनी सविस्तर माहिती दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.