For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘व्हिजन क्वेस्ट’चा ट्रेलर जारी

06:59 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘व्हिजन क्वेस्ट’चा ट्रेलर जारी
Advertisement

व्हिजन क्वेस्ट’ सीरिजचा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. या सीरिजमध्ये पॉल बेटनीची व्हिजनच्या रुपात वापसी होत आहे. यावेळी व्हिजन स्वत:ची आठवणी आणि वस्तुस्थितीदरम्यान प्रवास करताना दिसून येणार आहे. ‘व्हिजन क्वेस्ट’ स्वत:ची लोकप्रिय सीरिज ‘वांडा व्हिजन’ची पुढील कहाणी दाखविणार आहे. या सीरिजमये व्हिजन वांडामध्ये झालेल्या घटनांचा प्रभाव आणि त्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement

व्हिजन क्वेस्टच्या ट्रेलरची सुरुवात त्याच्या जुन्या आठवणींनी होते. ट्रेलरनुसार व्हिजन एक साधारण जीवन जगत असतो. परंतु त्याच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरीत असतात. यानंतर तो स्वत:च्या काल्पनिक जगात स्वत:च्या मुलाच्या शोधासाठी निघतो. या जगात त्याचा सामना अनेक चांगल्या वाईट लोकांशी होतो.

‘व्हिजन क्वेस्ट’ सीरिजमध्ये पॉल बेटनी आणि जेम्स स्पेडर मुख्य भूमिकेत आहेत. मार्वल स्टुडिओजचे प्रमुख केविन फीगे यांनी एका कार्यक्रमात पॉल बेटनी आणि जेम्स स्पेडर यांना सादर केले. बेटनी व्हिजनच्या रुपात वापसी करत आहे, तर स्पेडर खलनायक अल्ट्रॉनच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Advertisement

‘व्हिजन क्वेस्ट’चे दिग्दर्शन टेरी मटालसने केले असून त्याला ‘स्टार ट्रेक-पिकार्ड’साठी ओळखले जाते. या सीरिजचा प्रीमियर 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही सीरिज ‘वांडा व्हिजन’च्या घटनांवर आधारित आहे.

Advertisement
Tags :

.