For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वनाथ सुरेश उपांत्य फेरीत

06:40 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वनाथ सुरेश उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ उलानबातार

Advertisement

येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा नवोदित मुष्टियोद्धा विश्वनाथ सुरेशने विद्यमान विश्व्ाविजेत्या सॅनझार तश्केनबेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

पुरूषांच्या 50 किलो वजन गटातील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विश्वनाथसुरेशने आपल्या जबरदस्त ठोश्यांच्या जोरावर तश्केनबेचा तांत्रिक सरस गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली. कझाकस्तानचा तश्केनबे हा जागतिक मुष्टियोद्ध्यांच्या मानांकनात अग्रस्थानावर आहे. या लढतीपूर्वी विश्वनाथ सुरेशने या स्पर्धेत किर्जीस्तानच्या इरेगीशोव्हचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत पुढील फेरी गाठली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.