सांगलीचा विश्वनाथ बकाली 'महाबळेश्वर श्री'
महाबळेश्वर :
महाबळेश्वर शहरात सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने “मसल फॅक्टरी“ आयोजित “महाबळेश्वर श्री 2025“ ही भव्य विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली “महाबळेश्वर श्री 2025“ चा किताब सांगलीचा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपट्टू “विश्वनाथ बकाली“ यांनी पटकावला तर “महाबळेश्वर श्री 2025 “(महाबळेश्वर मर्या.) चा मानकरी “लक्ष्मण घोडके“ ठरला बेस्ट पोजिंग साठी ऋषिकेश वगरे,मेन्स फिसिक्स गौरव यादव (कराड) व मोस्ट मस्क्युलरचा किताब पंचाक्षर लोणार याने पटकावला विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख रक्कम व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
महाबळेश्वर मधील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्धेशाने “मसल फॅक्टरी“च्यावतीने सुरु केलेल्या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते भव्य व्यासपीठ,एलईडी क्रीन,आकर्षक चषक व स्पर्धेचे युट्यूब वर थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते स्पर्धकांसाठी तब्बल तीन लाख रुपयांची बक्षिसे स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते या स्पर्धेचे छ शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलनाने झाली यावेळी व्यासपीठवर पं स माजी सभापती संजयबाबा गायकवाड माजी नगराध्यक्ष किसनशेट शिंदे,युसूफभाई शेख ,अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर सुतार उपाध्यक्ष शरद बावळेकर माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार, सुनील शिंदे ऍड संजय जंगम संदीप साळुंखे प्रकाश पाटील विशाल तोष्णीवाल,नदीम शारवान,फकीरभाई वलगे,तौफिक पटवेकर जावेद वलगे पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे रोहित ढेबे प्रशांत कात्रट राजेंद्र पवार, शंकर ढेबे ऋषिकेश वायदंडे आशिष चोरगे महाबी फाउंडेशन सदस्यांसह मान्यवर उपस्थित होते.
मसल फॅक्टरीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मसल फॅक्टरीचे मार्गदर्शक ऍड संजय जंगम यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजनामागील उद्धेश विशद करताना अश्या स्पर्धांच्या माध्यमातून सदृढ,निरोगी पिढी घडविण्यासाठी मसल फॅक्टरीस सहकार्य करणाऱ्या प्रयोजकांचे आभार मानले विशाल तोष्णीवाल यांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
देशपातळीवर महाबळेश्वरचे नाव उंचविणाऱ्या महाबळेश्वरची कन्या सबा सलीम महापुळे, वीरगाथा उपक्रम 4.0 उपक्रमामध्ये यशस्वी ठरलेल्या दिशा संतोष ढेबे तसेच नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट अरसलान अमजद पटेल यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या शरीरसौष्ठव स्पर्धेचे विभागीय (सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,रत्नागिरी मर्या.) व महाबळेश्वर मर्यादित असे स्वरूप होते ही शरीरसौष्ठव स्पर्धा विविध गटांमध्ये पार पडली स्पर्धेमध्ये --
- विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे ----
50-55 किलो प्रथम क्रमांक अवधूत निगडे(कोल्हापूर),द्वितीय क्रमांक अक्षय देसाई (कराड), तृतीय क्रमांक सुरज नेवसे (सातारा) 55-60 किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक प्रतीक मगदूम (कोल्हापूर), द्वितीय क्रमांक अतिश विचारे (रत्नागिरी), तृतीय क्रमांक प्रताप ठाकूर (सातारा), 60-65 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक रामा मैनाक (सातारा) द्वितीय क्रमांक संदीप लोहार (कोल्हापूर),तृतीय क्रमांक ओंकार मिसाळ (कोल्हापूर), 65-70 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक पंचाक्षरी लोणार (सोलापूर),द्वितीय क्रमांक राकेश कांबळे (सांगली),तृतीय क्रमांक लक्ष्मण घोडके (मश्वर,सातारा) 70-75 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मयूर जबली (सांगली),द्वितीय क्रमांक रोहित गजरे (सातारा) तृतीय क्रमांक ऋषिकेश कदम (सांगली) 75-80 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक हाफिज अत्तार (सांगली) द्वितीय क्रमांक शहानवाझ नदाफ (कोल्हापुर),तृतीय क्रमांक ऋषिकेश वगरे (कोल्हापूर) 80 किलोवरील गटामध्ये प्रथम क्रमांक विश्वनाथ बकाली (सांगली) द्वितिय क्रमांक गौतम शिर्के (सांगली) तृतीय क्रमांक गुरुनाथ घाडगे (कोल्हापूर) यांनी पटकावला.
विविध वजनी गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या स्पर्धकांमध्ये “महाबळेश्वर श्री 2025“ साठी ची अंतिम फेरी पार पडली अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेमध्ये सांगली च्या प्रसिद्ध विश्वनाथ बकाली याने महाबळेश्वर श्री 2025 चा किताब पटकावला महाबळेश्वर शहरातील स्पर्धकांचा यंदा मोठ्या प्रमाणावर सहभाग या स्पर्धेमध्ये होता महाबळेश्वर मर्या.महाबळेश्वर श्री 2025 चा मानकरी लक्ष्मण घोडगे ठरला तर द्वितीय क्रमांक आकाश झाडे तृतीय क्रमांकावर आदित्य कोंढाळकर याला मिळाला.
या स्पर्धेत मेन्स फिजिक्स मध्ये प्रथम क्रमांक मेन्स फिसिक्स गौरव यादव (कराड) द्वितीय कोल्हापूरचा युवराज जाधव तर तृतीय क्र सियाल शेख कराड याना मिळाला ‘बेस्ट पोसिंग‘ चा ‘किताब ऋषिकेश वगरे,“मोस्ट मस्कुलर“ चा किताब पंचाक्षर लोणार याने पटकावले सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक रोख रक्कम व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या शरीरसौष्ठव स्पर्धेचे पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे,राजेश वडाम,ऍड नितीन माने,संदीप यादव,अजित सांडगे,विवेक संकपाळ,सचिन कुलकर्णी,चंदू पवार,अमोल ननवरे,धनंजय चौगुले मुरली वत्स संजय हिरेमठ अनिल फुले श्री कर्वे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळवदे यांनी केले तर आभार ऍड संजय जंगम यांनी मानले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मसल फॅक्टरीचे मार्गदर्शक ऍड संजय जंगम,प्रमुख सुमित क्षीरसागर,अमित माळवदे मनीष साळुंके प्रताप जाधव, ओंकार दीक्षित,अरबाज सुतार,संतोष मांजलकर,गौरव वाईकर,प्रशांत मोहिते गिरीश पोरे,,प्रणव ताथवडेकर,अक्षय चव्हाण प्रणित तोडकर आदींनी परिश्रम घेतले.