महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंदौर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वजित राणे यांनी केले स्वागत

12:13 PM Nov 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : सध्या मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारात गुंतलेले गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंदौर येथे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधानांसमोर विनम्र झालेल्या विश्वजित राणे यांचे दोन्ही हात पंतप्रधानांनी पकडले व राणे यांना आशीर्वाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशात इंदौर येथे प्रचारासाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुऊ आहेत. त्यांचे स्वागत करताना आपल्याला अत्यंत आनंद झाला. जगाचा एक दूरदर्शी नेता, ज्याने भारताला आपल्या कुशल नेतृत्वाने प्रगतीच्या अनेक वर्षे पुढे नेले त्यांच्यासमोर नम्र होताना देखील प्रचंड उर्जा व प्रेरणा मिळाली, असे राणे म्हणाले. देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्याने दिलेल्या आशीर्वादाने मन प्रसन्न झाले. या देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्पण आणि वचनबद्धता पाहता कर्तृत्वाने हा फार महान नेता आहे, असे उद्गार मंत्री विश्वजित राणे यांनी समाज माध्यमांतून व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article