महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्वजित यांनी केले तनुजाचे कन्यादान

11:55 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समाजाला दिला वेगळा संदेश : वडिलांच्या मृत्यूनंतर स्वीकारली जबाबदारी

Advertisement

वाळपई : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोपार्डे-सत्तरी येथील तनुजा सुरेश सावंत या तरुणीचे कन्यादान करून चांगला संदेश दिलेला आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयाची जनता हा आपला परिवार आहे, हे त्यांचे म्हणणे त्यांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. तनुजा सुरेश सावंत हिच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. सिमेंटचे पत्रे असलेल्या घरात हे कुटुंब राहत आहे. विश्वजित राणे यांच्याकडे तनुजाच्या लग्नाचा विषय पोहोचला तेव्हा त्यांनी स्वत: तनुजाचे कन्यादान करण्याचे मान्य केले आणि लग्नसोहळा काल रविवारी संपन्न झाला. भेडशी-महाराष्ट्र येथील चामुंडा मंगल कार्यालयामध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी आमदार डॉ देविया राणे यांनी यजमानपदाची भूमिका स्वीकारली आणि कन्यादान केले. आर्थिक पाठबळ त्यांनी या कन्येला प्रदान केले. दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.

Advertisement

आत्मिक समाधान : विश्वजित राणे

विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तनुजा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच आहे. यामुळे या लग्न सोहळ्याला सर्व प्रकारची मदत करण्याचे आमच्या कुटुंबाने मान्य केले. त्यानुसारच हा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एक आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त झालेले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

विश्वजित यांच्या कार्याने प्रभावित : देविया राणे

आमदार डॉ. देविया राणे सांगितले की, विश्वजीत राणे यांनी घेतलेल्या निर्णयाने आपण अत्यंत प्रभावित झालेले आहे. ही एक भावनिक गोष्ट आहे. मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने त्यांनी एका गरीब कुटुंबातील तनुजा हिच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली. सर्वती मदत करतानाच लग्नाला उपस्थित राहून कन्यादान कऊन आपले कर्तव्यही त्यांनी बजावल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article