विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग स्पर्धेच्या चषकांचे अनावरण
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या चषकांचे अनावरण मोठ्या उत्सहात पार पडले.युनियन जिमखाना मैदानावर पार पडलेल्या या चषकांच्या अनावरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय जाधव उपस्थित होते. द्वीप प्रज्वलन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संघमालक रोहित पोरवाल, ताहीर सराफ, मकसूद मारूफ, प्रदीप शेरीगार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे विविध पुरस्कर्ते राजू केलगेरी, अभिषेक कोळेकर, अमर सरदेसाई, सतीश नांदुरकर, यांचा गौरव करण्यात आला. विकास देसाई, प्रशांत लायंदर, संजय मोरे, महांतेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे धनंजय जाधव यांनी या लिटिल मास्टरसली क्रिकेट स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मान्यवराच्या उपस्थित चषकांचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व संघांचे क्रिकेटपटू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण सहा संघांचा सभाग असून स्पर्धेत 15 साखळी व तीन बाद फेरीचे असे एकूण 18 सामने होणार आहेत.