For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विशाल परब यांचा कार्यकर्त्यांसह 'मन की बात' कार्यक्रमात सहभाग

03:46 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
विशाल परब यांचा कार्यकर्त्यांसह  मन की बात  कार्यक्रमात सहभाग
Advertisement

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात केले होते नियोजन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी,नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत यासाठी संपर्क कार्यालयात प्रक्षेपण कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी श्री विशाल परब यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.