कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Vishalgad Fort : विशाळगड अतिक्रमण, उरसावरुन हिंदुत्वादी आक्रमक, आंदोलनाचा कडक इशारा

10:36 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

'विशाळगडावर बंद केलेला उरूस पुन्हा सुरू केला तर तो उधळून लावू'

Advertisement

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण आणि उरूसावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत विशाळगडावर बंद केलेला उरूस जर पुन्हा सुरू केला तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तो उधळून लावतील, असा इशारा दिला आहे.

Advertisement

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर राज्य शासनाने विशाळगडावरील उरूस बंदचा निर्णय घेतला होता. परंतू यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य बाजू मांडली गेली नसल्याने उरुसाला परवानगी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. उरुस सुरू होण्यास तीन दिवसाचा अवधी असून प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडून उरुसावर कायमची बंदी घालावी तसेच येथील सर्व अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विशेष अधिकार वापरुन उरुसावर बंदी घाला अन्यथा राज्यातील सर्व हिंदुत्ववादी एकत्र येऊन विशाळगडावरील उरूस उधळून लावू, असा इशाराही दिला आहेविशाळगडावरील सर्व अतिक्रमण हटवावे, प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात जाऊन येथील उरूसावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

तसेच विशाळगडावर उरूस करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील सर्व शिवभक्ती एकत्र येऊन हा उरूस उधळून लावतील, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला. विशाळगडावरील सर्व अतिक्रमण हटवा, उरूस कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी बुधवारी हिंदू एकता आंदोलनासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.

माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावर मलिकरेहान दर्गा आहे. या दर्ग्यात अनेक वर्ष बकरी ईदच्या दरम्यान तीन दिवस ऊरूस भरवला जातो. उरसामध्ये हजारो कोंबड्या-बकऱ्यांचा बळी दिला जातो. या सर्व गोष्टी ज्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी स्वत:चे बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत.

गेल्यावर्षी आम्ही मागणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे भरणाऱ्या उरसावर बंदी घातली होती. विशाळगडावर कोंबडी-बकऱ्यांची कत्तल करायला, मांस शिजवायला आणि मद्य प्राशनाला सरकारने बंदी घातली आहे. यंदाही बकरी ईद दरम्यान पुन्हा येथे काही जण ऊरूस भरवण्याच्या तयारीत आहेत. तरी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान, सय्यद बंडाच्या थडग्यावर अवैध दर्गा उभारला होता.

त्या दर्ग्यामध्ये असाच ऊरूस भरत होता. परंतु आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बंदी घातली होती. त्याच पद्धतीने विशाळगडावर उरूसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी, येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे.

हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, गणेश नारायणकर, संजय सोडोलीकर, प्रतीक डिसले, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रसाद रिसवडे, चंद्रकात बराले, गजानन तोडकर, हिंदुराव शेळके, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अरविंद येतमाले, अरुण वाघमोडे, विलास मोहिते, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.

वकिलांची फौज उभी करा

विशाळगडावर एकूण 158 अतिक्रमणे होती. त्यापैकी 94 अतिक्रमणे काढली असून 64 अतिक्रमणांपैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे. 31 में रोजी राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. ज्यांनी न्यायालयात जाऊन स्थगिती घेतलेली आहे. त्यांच्या विरोधात सरकारने नामवंत वकिलांची फौज उभी करून दिलेली स्थगिती उठवून उर्वरित सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.

प्रतापगडाप्रमाणेच करवाई करा

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या नावाने बांधलेला अवैध दर्गा जसा सरकारने बुलडोजर लावून जमीनदोस्त केला, त्याप्रमाणे विशाळगडावरील दर्ग्यांतील तीनमजली आरसीसी अवैध बांधकाम जमीनदोस्त करावे. संपूर्ण विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

प्रशासनाच्या बाजूने निर्णय होईल

"उरूसाबाबत प्रशासनाने न्यायालयात योग्य भूमिका मांडली. अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ असून उर्वरीत अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अतिक्रमणाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. जुन अखेरीस पुढील सुनावणी असून यावेळी ताकदीने बाजू मांडली जाईल. प्रशासनाच्या बाजूने निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे."

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

लक्षवेधी फलक

कोर्टातील स्थगिती उठवून विशाळगडावरील उर्वरीत अतिक्रमण हटवा, संपूर्ण विशाळगड अतिक्रमणमुक्त करा, विशाळगडावर भरणाऱ्या उरूसावर कायमस्वरूपी बंदी घाला, विशाळगडावरील अतिक्रमणावर बुलडोझर फिरवा, आदी फलक होते.

मोजणी तात्काळ करा गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील मोजणीची मागणी केली जात आहे. परंतु आजपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही. मोजणी झाल्यानंतर येथे नेमके किती अतिक्रमण झाले, हे स्पष्ट होईल, अशी भूमिका हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

बाजू मांडण्यात वकील अपयशी

गतवर्षी पावसाचे कारण पुढे करत विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवली होती. वर्ष होत आले तरी येथील संपूर्ण अतिक्रमण हटलेले नाही. जिल्हा प्रशासनाचे वकील बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचे गजनान तोडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निदर्शनास आणले. यास प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींचेही हे अपयश असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Advertisement
Tags :
#kolhapur News#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#VishalgadFortAmol YedgeKolhapur collector Amol Yedgevishalgad atikramanvishalgad fort atikramanविशाळगड अतिक्रमण liveविशाळगड अतिक्रमण बातमी
Next Article