For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलेशियाचा भारतीयांना विनाव्हिसा प्रवेश

06:02 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
मलेशियाचा भारतीयांना विनाव्हिसा प्रवेश
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

थायलंड आणि श्रीलंका यांच्यापाठोपाठ मलेशियानेही भारतीय नागरीकांना आपल्या देशात विनाव्हिसा पर्यटनासाठी प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भारतीयांना मलेशियात 30 दिवसांच्या कालावधीसाठी विनाव्हिसा प्रवेश देण्यात येईल, अशी घोषणा त्या देशाच्या पर्यटन विभागाकडून करण्यात आली आहे.

मलेशियाने भारतीयांना पर्यटनाच्या अन्य सुविधाही यापूर्वीच दिल्या आहेत. ही नवी विनाव्हिसा प्रवेशाची सुविधा पूर्वीच्या सुविधांच्या व्यतिरिक्त आहे. खाडीतील देश, इतर पश्चिम आशियायी देश आणि तुर्किये या देशांच्या नागरीकांनाही मलेशियाकडून अशा सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

पर्यटकांच्या संख्येत वाढ

भारतातून मलेशियात पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 2022 मध्ये 3 लाख 24 हजार भारतीयांनी या देशाचे पर्यटन केले होते. तर 2023 च्या पहिल्या तिमाहीतच जवळपास 1 लाख 70 हजार भारतीयांनी मलेशियात सहल केली होती. ही संख्या आणखी वाढावी म्हणून तो देश प्रयत्नशील असून त्यासाठीच ही विनाव्हिसा योजना असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आठवड्याला 158 विमाने

भारतीयांना मलेशियाला घेऊन जाण्यासाठी आठवड्याला 158 विमानांची उपलब्धता आहे. या विमानांची आसन क्षमता 30,032 आहे. मलेशियाची विमानसेवाही यासाठी सज्ज असून भारतीय या सेवांचा लाभ घेत आहेत, अशी माहितीही या देशाच्या पर्यटन विभागाने सोमवारी दिली आहे.

Advertisement
Tags :

.