‘व्हिआय’ची 5-जी सेवा मुंबई पाठोपाठ चेन्नईमध्ये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया (व्हिआय) ने चेन्नईतील प्रसिद्ध एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे त्यांची 5जी सेवा सुरू केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18 व्या हंगामानिमित्त कंपनीने हे पाऊल उचलले आहे, जेणेकरून क्रिकेट चाहत्यांना जलद आणि चांगला इंटरनेट अनुभव मिळू शकेल. व्होडाफोन आयडियाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आयपीएलचा हा हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला आहे. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना चेपॉक स्टेडियममध्ये होणार आहे. व्हिआयने हा मोठा सामना पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो प्रेक्षकांसाठी स्टेडियममध्ये अतिरिक्त 5जी साइट्स स्थापित केल्या आहेत. कंपनीने त्यांची नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी बीटीएस आणि मॅसिव्ह एमआयएमओ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे जलद इंटरनेट गती आणि अखंड कनेक्शन प्रदान करण्यात मदत होते.
व्हिआयने भारतात पहिल्यांदाच 19 मार्च रोजी आपली 5 जी सेवा सुरू केली. कंपनीने ही सेवा मुंबईपासून सुरू केली. लवकरच देशाच्या इतर भागात 5जी सुरू केले जाईल.