एअरटेल, जिओसह व्हीआयची 11,340.78 कोटींची 5जी स्पेक्ट्रम खरेदी
दूरसंचार विभागाकडून करण्यात आले वाटप : गुरुवारी संबंधीत कंपन्यांना पत्र सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दूरसंचार विभागाने (डीओटी) तीन्ही खासगी दूरसंचार ऑपरेटर यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. ज्यांनी जूनच्या लिलावात एअरवेव्ह विकत घेतले. तर गुरुवारी कंपन्यांना फ्रिक्वेन्सी असाइनमेंट लेटर जारी करण्यात आले आहेत, असे या विभागातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कंपन्यांनी 26 जुलै रोजी अॅडव्हान्स पेमेंट केले आणि स्पेक्ट्रम विक्रीतून दूरसंचार विभागाला 1,000 कोटींहून अधिक रक्कम आली. पेमेंट मिळाल्यानंतर फ्रिक्वेन्सी वाटप करण्याची अंतिम मुदत 30 दिवस होती, परंतु दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम वाटप करण्यात गती दाखवली आहे कारण सामंजस्य प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली होती.
हा एक छोटा लिलाव असल्याने आणि बहुतेक एअरवेव्हस सुसंगत करण्यात आल्याने, वाटप त्वरीत केले गेले आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया(व्हीआय)काही नवीन स्पेक्ट्रमसह किरकोळ बदलांसह त्यांच्या विद्यमान फ्रिक्वेन्सी कायम ठेवतील. रिलायन्स जिओवर देखील परिणाम झाला आहे.
भारती एअरटेल ही सर्वात मोठी खरेदीदार
26 जून रोजी संपलेल्या 5जी स्पेक्ट्रम विक्रीमध्ये भारती एअरटेल ही सर्वात मोठी खरेदीदार होती, ज्यांनी 6,856.76 कोटी रुपयांच्या 97 मेगाहर्ट्झ 5 जी एअरवेव्हची खरेदी केली. व्हीआय हा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार होता, ज्यांनी 30 एमएचझेड 5जी स्पेक्ट्रम 3,510.40 कोटी रुपयांना खरेदी केले. टेलिकॉम मार्केट लीडर रिलायन्स जिओने 973.62 कोटी रुपयांच्या 5जी एअरवेव्हचा किरकोळ हिस्सा विकत घेतला, जो कोणत्याही लिलावात आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
एअरटेल आणि व्हीआय या दोन्ही कंपन्यांनी प्रामुख्याने अशा मंडळांमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले जेथे त्यांची परवानगी या वर्षी संपणार होती. जिओने कमीत कमी खर्च केला कारण त्याच्याकडे आधीच पुरेसा स्पेक्ट्रम आहे.