For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये व्हर्च्युअल चर्चा

06:41 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये व्हर्च्युअल चर्चा
Advertisement

नितीशकुमार, लालू, खर्गे, पवार सहभागी :  जागावाटपासह अनेक मुद्यांवर विचारविमर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी ‘इंडिया’ या विरोधी आघाडीच्या चार बड्या नेत्यांची बुधवारी व्हर्च्युअल बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते.

Advertisement

आभासी बैठकीत ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांमधील जागावाटपावर चर्चा झाली. यासोबतच नितीश कुमार यांना ‘इंडिया’चे समन्वयक बनवण्याबाबतही प्राथमिक बोलणी झाल्याचे समजते. इतर पक्ष यावर सहमत असल्यास लवकरच नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्याची घोषणा केली जाऊ शकते.

बिहारशी संबंधित अनेक राजकीय अटकळांच्या दरम्यान ही महत्त्वाची बैठक झाली आहे. बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे का? तेजस्वी यादववर ईडी कारवाई करू शकते का? नितीशकुमार यांना ‘इंडिया’चे समन्वयक बनवता येईल का? असे विविध प्रश्न गेल्या आठवड्यापासून राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. त्यातच नितीशकुमार यांनी लालन सिंह यांच्याकडून पक्षाची कमान परत घेतल्यापासून नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होऊ शकतात अशी चर्चाही जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत आजच्या आभासी बैठकीकडे राजकीय तज्ञांचे लक्ष लागलेले होते.

Advertisement
Tags :

.