For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

३ कोटींच्या आरोपावरून राजकीय संघर्ष; ‘पुरावा द्या, आमदारकीचा राजीनामा देईन’: वीरेश बोरकर यांचे आव्हान

05:52 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
३ कोटींच्या आरोपावरून राजकीय संघर्ष  ‘पुरावा द्या  आमदारकीचा राजीनामा देईन’  वीरेश बोरकर यांचे आव्हान
Advertisement
पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर यांच्यात पक्षाच्या नावाचा वापर आणि पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाच्या वतीने उपस्थित राहण्याच्या अधिकारावरून सुरू झालेल्या या वादाला आता ३ कोटी रुपयांच्या आरोपांचीही जोड मिळाली आहे.

अजय खोलकर  यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याविरोधात कारवाई करण्याचे आव्हान दिले आहे. “Kupp warning zali… Bring it on… am waiting,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. आपल्याविरोधात कोणतीही कारवाई झाल्यास त्याला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सूचित केले.

Advertisement

पक्षाच्या प्रतिनिधित्वावरून बोरकर आक्रमक

या वादावर प्रतिक्रिया देताना आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी अजय खोळकर यांना पक्षाचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील बैठकीला पक्षाच्या वतीने उपस्थित राहणे अनधिकृत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पक्षाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बोरकर यांनी दिला. गरज पडल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

आरजीपी सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देणार

पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी कोण आहेत, याबाबत भविष्यात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी आरजीपीच्या सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी जाहीर केले. या ओळखपत्रांमुळे पक्षाच्या वतीने बैठका आणि अन्य अधिकृत प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार कोणाला आहे, हे स्पष्ट करता येईल, अशी त्यांची भूमिका आहे.

वादात भाजपचाही उल्लेख

या प्रकरणात बोरकर यांनी भाजपच्या सहभागाचाही आरोप केला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत प्रतिनिधित्वाच्या वादाला व्यापक राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप आणि दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, ३ कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा आरोप, पक्षाच्या नावाचा वापर आणि अधिकृत प्रतिनिधित्वाचा मुद्दा यांवरून आरजीपीमधील हा वाद चिघळला आहे. संबंधित आरोपांबाबत दोन्ही बाजूंच्या भूमिका आणि पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.